शिवसेना भाजपच्या दावणीला शिवसेना बांधल्याचा आरोप; शिंदेंसमोरच उफाळली शिवसैनिकांची नाराजी

शिंदेसनेतील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला आहे. धाराशिवच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यापुढे शिवसैनिकांनी अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. यावेळी शिवसैनिकांनी भाजपच्या दावणीला शिवसेना पक्ष बांधल्याचा आरोप केला. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी संतप्त होत या शिवसैनिकांना खडेबोल सुनावले.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी धाराशिव दौऱ्यावर होते. याठिकाणी शिंदेगटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले. यावेळी देखील काही शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी देखील अन्यायाचा पाठा एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवणार असल्याचे सांगितले होते. पण त्यांच्या दौऱ्यापूर्वीच त्यांच्याच शिवसैनिकांना नजरकैद केले होते.

धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर निवडणुकीत झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. सोलापुरात धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या समोरच धाराशिव येथील पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीदरम्यान शिवसैनिकांनी निवडणुकीतील घडामोडींवर चर्चा करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पक्ष भाजपच्या दावणीला बांधण्याचा पदाधिकाऱ्यांनी आरोप केली. यावेळेस खासदार श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत ‘पदाधिकाऱ्यांना शिस्त नाही, बोलायला दिलं तर तुम्ही एकमेकांबरोबर मारामारी करता का?’ अशी आक्रमक भूमिका मांडली. तुळजापूर, कळंब आणि धाराशिव तालुक्यातील पक्ष संघटनेच्या कामगिरी बाबत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय झाला असून आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे न्याय मागणार असल्याचे शिवसैनिक नितीन पाटील यांनी सांगितले होते. शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या लोकांशी हातमिळवणी करत शिवसेनेतील एकनिष्ठ शिवसैनिकावर अन्याय केला आहे, अशा आरोप नितीन पाटील यांनी केला होता. त्यानंतर आज शिवसैनिकांनी थेट खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोरच पक्षातील अंतर्गत वादावर भाष्य करत नाराजी व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles