राज्यात खळबळ! जिल्हाधिकाऱ्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

लाच घेणं आणि लाच देणं हा कायद्याने गुन्हा असला तरी, कामं पूर्ण देण्याच्या आश्वासनाखाली आजही लाच घेतली जाते. अशीच घटना अकोल्यात घडली आहे. एका अप्पर अधिकाऱ्याने खाणी सुरु ठेवण्यासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रमोद गायकवाड असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या अधिकाऱ्याविरोधात BNS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्या विरोधात पुरावे म्हणून खान मालकांनी ऑडिओ क्लिप्स सादर केले. मात्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गौण खनिजाच्या जवळपास ७० खाणी आहेत. या खाणींमध्ये दगड, गिट्टी, क्रशर आणि मुरूम खाणींचा समावेश आहे. गिट्टी आणि दगड खाणी सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकवाड यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांची मागणी, तसेच धमकी दिल्याचा आरोप खाण मालकांनी केला होता.

यासंदर्भात पैशाची मागणी केलेल्या खानमालकांनी अकोल्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड यांच्याविरोधात तक्रार केली. यासंदर्भात ऑडिओ क्लिप्स त्यांनी पुरावे म्हणून दिले. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खानमालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर ९ दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

संपूर्ण चौकशीनंतर या प्रकरणात अप.नं. 270/2026 कलम 308(2), 351 (1), BNS सह कलम 7 PCA नुसार गुन्हा दाखल केलाय. १५ हजार रुपये खंडणी मागितली, पैसे न मिळाल्यास तुमचे व्यवसाय बंद पाडू, अशा धमकी प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अशा लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles