कैसा हराया…सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात येताच नॉट रिचेबल

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील चर्चेत आलेला प्रभाग क्रमांक 30 या प्रभागातून एमआयएमच्या उमेदवार सहर शेख  यांनी विजय मिळवत राजकारणात जोरदार एन्ट्री केली. पालिकेच्या निवडणुकीनंतर सहर शेख यांच्या कैसा हराया…या डायलॉगची ठाणे, मुंबईसह राज्यभरात मोठी चर्चा रंगलेली होती. आता याच सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा नगरसेवक सहर शेख चर्चेत आल्या आहेत. त्यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आल्यानंतर आता सहर शेख नॅाट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

 

वडीलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरुन सहर शेख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सहर शेख आणि वडील युनूस शेख नॅाट रिचेबल झाले असल्याचं समोर आलं आहे. सहर शेख मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० मधून MIM पक्षाच्या नगरसेविका आहेत. मात्र सहर शेख आणि त्यांचे वडील गेल्या काही दिवसांपासून मुंब्य्रात देखील नसल्याची माहिती आहे. जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणी शेख परिवाराकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. सिद्दीकी फराह शबाब अहमद या तरुणीने सहर शेख यांच्याबाबत तक्रार केली होती. तक्रार करणारी ⁠सिद्दीकी फराह शबाब अहमद ही तरूणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवार होती. ⁠प्रभाग क्रमांक ३० मधूनच ती देखील उमेदवार होती.

ठाणे महापालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून बोगस जात प्रमाणपत्र दाखला सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सहर शेख यांनी बनावट कागदपत्राचे आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रारदाराची मागणी आहे. सहर शेखकडून यंत्रणांची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील गाजियाबादची मूळ रहिवासी युनूस इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला. त्यांची मुलगी सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले आणि त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles