onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -16-04–2026 एकुण कांदा गोणी -44,339
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 800 ते 1100
2 नंबर= 500 ते 800
3 नंबर= 250 ते 500
4 नंबर= 150 ते 250
————————————————————————————————————-
दारूसाठी पैसे न दिल्याने दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी
आदर्श गौतमनगरमधील प्रकार
अहिल्यानगर -शहरातील आदर्श गौतमनगर परिसरात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या कारणावरून एका तरुणाने शेजारी राहणार्या पती-पत्नीला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप बाबूलाल भागुरे (वय ३२) हे आपल्या कुटुंबासह रेल्वे स्टेशन परिसरातील आदर्श गौतमनगर येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भागुरे हे आपल्या घरासमोर उभे असताना, त्यांचा शेजारी सलीम पठाण हा त्या ठिकाणी आला. त्याने भागुरे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, भागुरे यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
या नकाराचा राग मनात धरून आरोपी सलीम पठाण याने भररस्त्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने संदीप भागुरे आणि त्यांच्या पत्नीला अतिशय घाण अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, ’तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेनंतर घाबरलेल्या भागुरे कुटुंबाने कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत.


