भाजपमध्ये फूट, मोदींना हटवण्यासाठी षडयंत्र; बड्या राजकीय नेत्याच्या आरोपाने राजकारणात खळबळ

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी विधेयक नामंजूर होण्यावरून काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. तर काँग्रेसकडूनही टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. महाराष्ट्रात महायुतीनेही विरोधकांच्या भूमिकेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीकडून राज्यात एका कोटी महिलांच्या स्वाक्षऱ्या गोळ्या करण्यात येणार आहे. तसेच राज्यभरात मेळावे आयोजित केले जाणार आहेत. महिला आरक्षण विधेयक नामंजूर होण्यावरून राजकारण तापलं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी देशासहित राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तर महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर सुरू झालेल्या राजकारणावरही राऊतांनी मोठं विधान केलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, ‘कोणतेही विधेयक पाडण्यात आलेले नाही. ज्याचा संबंध महिला आरक्षणाशी आहे. भाजप किंवा भाजपमधील एका गटाला प्रधानमंत्री पदावरून नरेंद्र मोदींना घालवण्याचे वेध लागले आहेत. त्या गटांमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत की मला माहीत नाही’.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles