बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. यासाठी आज मतदान प्रक्रिया होत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विजयासाठी पवार कुटुंब ताकदीने मैदानात उतरलं आहे. जिंकण्यापेक्षा किती मताधिक्क्याने विजय होणार ते महत्वाचं आहे. अजितदादा यांच्या अकाली जाण्याने बारामती मतदारसंघात एक सहानुभूतीची लाट आहे. दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत 60 टक्के मतदान होईल, असं मत जय पवार यांनी व्यक्त केलं आहे. मी जे सकाळी बोललो त्याचा उल्लेख तुम्ही चुकीचा घेतला. मला पक्षासाठी काम करायचे आहे. 2029 ला मी उमेदवारी घ्यावी, ही लोकांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे की मी लोकांसोबत काम करावं असे जय पवार म्हणाले.
मी आधीपासून सांगत आलोय मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे जय पवार म्हणाले. नगराध्यक्ष पदी माझं नाव आलं होतं, त्यावेळी देखील मी दादांना सांगितलं होतं मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे आहे. युगेंद्र दादा म्हणाले आहेत आम्ही विरुद्ध नव्हते लढायला पाहिजे. मलाही असं वाटतंय की कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहायला पाहिजे असे जय पवार म्हणाले. रोहित दादा असं म्हणाले पवार विरुद्ध पवार होणार अशी आमची इच्छा नाही असे जय पवार म्हणाले.माझं सकाळी चांगलं मतदान झालं दुपारी कमी झालं परत चार नंतर वाढत असल्याचे जय पवार म्हणाले. माझ्या मनात कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा आहे असे जय पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल देखील जय पवार यांना विचारण्यात आले. यावेळी जय पवार म्हणाले की, माझं रेवतीशी बोलणं झालेलं आहे, आजोबांना डिस्चार्ज झाला आहे असे जय पवार म्हणाले.


