आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचा नावलौकिक
अहिल्यानगर: वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानात हातखंडा मिळवत आपल्या अचूक कौशल्याने अहिल्यानगरमधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. हृषिकेश पंडित यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. केनियाची राजधानी नैरोबी येथील प्रतिष्ठित ‘एस्टर हॉस्पिटल’ येथे आयोजित विशेष ‘लॅपरोस्कोपी कार्यशाळेमध्ये त्यांना स्त्री रोगावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यात सहभागी होत डॉ.पंडित यांनी अत्यंत गुंतागुंतीच्या मानल्या जाणाऱ्या अनेक स्त्रीरोग शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या.
नैरोबी येथील प्रसिद्ध प्रा. रफिक पारकर आणि प्रा. जोसेफ वायोईके यांच्या निमंत्रणावरून डॉ . पंडित या कार्यशाळेत सहभागी झाले होते. त्यांनी जटिल शस्त्रक्रिया दुर्बिणी सहाय्याने यशस्वीरित्या केल्या.

एण्डोमेट्रोसीस , फायब्रॉइड्स आणि गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारणासाठी उपयुक्त ठरणारी ‘फर्टिलिटी-प्रिझर्व्हिंग शस्त्रक्रिया अतिशय कुशलतेने करून डॉ. पंडित यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला. विशेषतः ज्या रुग्णांवर यापूर्वी ४ वेळा शस्त्रक्रिया होऊनही यश आले नव्हते, अशा अत्यंत गंभीर *ग्रेड ४ एण्डोमेट्रीओसीसने त्रस्त महिलेवर डॉ. पंडित यांनी लॅपरोस्कोपीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यांच्या या कौशल्याचे तेथील तज्ज्ञांनी विशेष कौतुक केले.
या दौऱ्यामुळे आफ्रिकेतील महिलांना जागतिक दर्जाच्या उपचार पद्धती मिळू शकतात. डॉ हृषिकेश पंडित यांच्या कामगिरीचे अहिल्यानगर तसेच देशातील वैद्यकीय क्षेत्रातून कौतुक होत आहे. डॉ. पंडित यांचे अहिल्यानगर मधील कोठी रोड येथील पंडित हॉस्पिटल मध्ये जागतिक दर्जाच्या थ्री डी लेप्रोस्कोपी तंत्रज्ञानाने सुसज्ज सेंटरमध्ये सर्व प्रकारचे स्त्रीरोग उपचार उपलब्ध आहेत. यात वंध्यत्व निवारण आधुनिक उपचार, गर्भाशय, स्तनाचे कॅन्सर निदान व उपचार, दुर्बिणीद्वारे गर्भाशय कॅन्सर शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या स्त्रियांची गर्भनलिका परत जोडण्याची शस्त्रक्रिया, गर्भाशयाच्या गाठी काढणे, गर्भ नलिकेतील गर्भ दुर्बिणीद्वारे काढणं, हिस्टेरोस्कोपी, अधेसिवोलिसीस, दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढणे अशा विविध उपचार सुविधा उपलब्ध आहेत. प्रसूती नॉर्मल होण्यासाठी बाळाच्या हृदयाचे ठोके व बाळाची स्थिती दर्शलणारे एन.एस.टी. मशीन, हाय रिस्क प्रेगनन्सी, अद्ययावत सोनोग्राफी मशिन हॉस्पिटलमध्ये आहे. नगरसह परजिल्ह्यातील रूग्ण येथील तंत्रज्ञान युक्त आरोग्य सेवांचा लाभ घेत असतात.


