IPL 2026… मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीवर अंबानी नाराज…सामना सुरू असतानाच मैदान सोडलं… video

IPL 2026 गुरूवारी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स कडून मुंबई इंडियन्सचा 103 धावांनी झालेला लाजिरवाणा पराभव हा टीमच्या खेळाडूंच्या आणि चाहत्यांच्याही हृदयात खुपणारा आहे. या पराभवाने मुंबई इंडियन्सचा संघात भूकंप झाला असून प्रचंड खळबळ माजली आहे. चेन्नईने दिलेल्या 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ अवघ्या 104 धावांवर ऑलआऊट झाला. संघाच्या या खराब कामगिरीमुळे टीमचा मालक असलेला आकाश अंबानी इतका वैतागला की, सामना संपण्यापूर्वीच तो डगआऊटमधून उठून मैदानातून निघून गेला.

https://x.com/Vikas662005/status/2047514438207738184?s=20
आकाश अंबानी मैदानातून जातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तो फक्त स्वतःच मैदान सोडत नव्हता तर निराश झालेल्या चाहत्यांनाही त्याने स्टेडियम सोडून जाण्याचा इशाराही केला.

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाचा डाव पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळत असताना, आकाश अंबानींचा संयम संपला. त्याची नाराजी व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून आली.

पाच वेळच्या विजेत्या ठरलेल्या संघाच्या या लाजिरवाण्या पराभवामुळे मॅनेजमेंट नाराज असल्याचं चाहत्यांना वाटतंय. कारण मुंबईचा सामना संपण्यापूर्वीच मालकाने (आकाश अंबानी) मैदान सोडल्यान संघाचं भविष्य आणि कर्णधारपदाबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles