लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ३० एप्रिलनंतर या महिलांचे १५०० रुपये कायमचे बंद

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, त्याआधी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता ३० एप्रिलनंतर अनेक महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीयेत. दरम्यान, यामध्ये तुम्हालाही योजनेचा लाभ मिळणार की नाही ते जाणून घ्या.लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांचा लाभ याआधीच बंद करण्यात आला आहे. त्यात आता महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. केवायसीमधील दुरुस्तीसाठी फक्त ८ दिवस उरले आहेत. त्या काळात महिलांनी केवायसीमध्ये दुरुस्ती केली नाही तर त्यांचा लाभ बंद होणार आहे. या महिलांना कधीच पैसे मिळणार नाही.लाडकी बहीण योजनेत केवायसी केल्यानंतर महिलांची पुन्हा पडताळणी होणार आहे. या पडताळणीत जर तुम्ही अपात्र ठरलात तर तुमचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. महिलांना यापुढे १५०० रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे जर तुम्ही अपात्र असाल केवायसी केली नसेल तर तुमचा लाभ बंद केला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही याआधी केवायसी करताना काही चुक केली असेल. तुमचा लाभ बंद झाला असेल तर तुम्हाला त्यात दुरुस्ती करायची आहे. जर तुम्ही दुरुस्ती केली नाही तर तुमचा लाभ बंद केला जाईल. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन दुरुस्ती करायची आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles