सोने आणि चांदीच्या दरात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने वाढ होताना दिसून आली. ही वाढ किरकोळ नव्हती तर प्रत्येकवेळी दर नव्या उच्चांकावर पोहोचत होता. त्यामुळे सर्वसामान्यांना दागिने खरेदी करण्यासाठी खिसा रिकामा करावा लागत होता. पण आता सर्वसामान्यांच्या कामाची बातमी आहे. कारण, उच्चांकावर पोहोचलेले सोन्याचे दर आता स्थीर झाले आहेत. त्यामुळे आता स्वस्तात सोने-चांदी खरेदीची एक संधी उपलब्ध झाली आहे. मात्र अशातच आज २६ एप्रिल २०२६ रोजी, रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २६ एप्रिल २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५४,०४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,४१,२०० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.


