अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेस ५ कोटी ८ लाखांचा ढोबळ नफा – चेअरमन सुनील नागरे

अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेस ५ कोटी ८ लाखांचा ढोबळ नफा – चेअरमन सुनील नागरे
अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेस सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षामध्ये ५ कोटी ८ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, आवश्यक त्या तरतुदी रक्कम रुपये ४ कोटी ४० लाख ५८ हजार रुपये वजा जाता संस्थेस निव्वळ नफा ६७ लाख ५२ हजार रुपये झाला असल्याची माहिती चेअरमन सुनील नागरे यांनी दिली.
या नफ्यातून संस्थेच्या सभासदांना याही वर्षी १५ टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळ करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चेअरमन नागरे यांनी सांगितले मार्च २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांच्या शुभविवाह प्रसंगी ११०००/- इतक्या रकमेचा धनादेश देण्यात येतो. दरवर्षी सभासदांना दीपावली निमित्त प्रति सभासद १५किलो साखर वाटप करण्यात येते. मयत सभासदांचे १०० टक्के कर्ज माफ केले जाते. राज्यात पगारदार कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेमध्ये सर्वाधिक कर्ज वितरण करणारी अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था एकमेव पतसंस्था असून तिचा राज्यभर नावलौकिक आहे. सभासदांना ४५ लाख रुपये इतक्या रकमेचे मागणीनुसार संस्थेच्या वतीने कर्ज वितरण केले जाते. संस्थेच्या सभासदांना ४० लाख रुपये विमा कवच देण्यात आलेले आहे. संस्था स्थापनेपासून ऑडिट वर्ग “अ” आहे. पतसंस्थेत ठेवीवर १०.५० टक्के व्याज दिले जाते.

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील म्हणाले ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था गेली ३६ वर्षापासून यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. ‘”एकच ध्यास, सभासदांचा विकास'” या ब्रीद वाक्यानुसार पतसंस्था मार्गक्रमण करत आहे. संस्थेमार्फत वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात. प्रत्येक कार्यक्रमाला सभासदांचे भक्कम पाठबळ मिळत असते. आपल्या संस्थेमध्ये ठेवीचा ओघ वाढण्यासाठी सर्व संचालक व सभासदांनी प्रयत्न करावेत असे आवाहन युवराज पाटील यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक नरसाळे, व्हा. चेअरमन सुनील वाघ, मानद सचिव सविता भाकरे, संचालक सतिश मोटे, दिलीप नागरगोजे, शामराव भोसले, मंगेश पुंड, वाळीबा मुंढे, रूबाब पटेल, किसन भिंगारदे, उध्दव जाधोर, संदीप लगड,भगवान खेडकर, रामदास गोरे, नारायण खेडकर, सुरेश मंडलिक, अशोक खळेकर, भाऊसाहेब गायकवाड,राणी वाघ,तज्ज्ञ संचालक एकनाथ ढाकणे, मधुकर जाधव,लक्ष्मण नागरे, पसंस्थेचे व्यवस्थापक प्रदीप कल्याणकर, वरिष्ठ सहायक नफीसखान पठाण आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles