अहिल्यानगर बोल्हेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर खूनी हल्ला

अहिल्यानगर -बोल्हेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर टोळक्याने कोयता आणि लाकडी दांडक्याने खूनी हल्ला केल्याची घटना रविवारी (26 एप्रिल) रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. प्रकाश ज्ञानदेव सप्रे (वय 39, रा. बोल्हेगाव रस्ता, सप्रे मळा, नागापूर) असे जखमी विश्वस्ताचे नाव असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मंदिरात रात्रीच्या वेळी एका मुलीसोबत बसलेल्या तरूणाला हटकल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

जखमी प्रकार सप्रे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी (27 एप्रिल) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. ओम आप्पा कनगरे, अनुष आप्पा कनगरे, लकी कदम, ज्ञानु आमले, आदेश गायकवाड, आदित्य कवडे, सोनु कोलते (सर्व रा. बोल्हेगाव) व इतर तीन ते चार अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी प्रकाश सप्रे हे रात्री 10 च्या सुमारास मंदिरात गेले असता, त्यांना त्या ठिकाणी ओम कनगरे हा एका मुलीसोबत बसलेला दिसला. सप्रे यांनी त्याला एवढ्या रात्री येथे काय करतो, असे विचारले. याचा राग मनात धरून ओम याने फोन करून आपल्या साथीदारांना बोलावून घेतले.

काही वेळातच अनुष कनगरे व इतर साथीदार तेथे आले. त्यांनी सप्रे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला. मंदिराचे रक्षक आणि नातेवाईक मदतीला धावून आल्याने सप्रे यांचा जीव वाचला. हल्लेखोर पळून जात असताना नागरिकांनी ओम आणि अनुष कनगरे या दोघांना जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles