अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत, तब्बल दीड महिन्यानंतर रुपाली चाकणकर पुन्हा ‘अ‍ॅक्शन मोड’वर’

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचं कनेक्शन समोर आलं आहे. त्यात रुपाली चाकणकरांनाही खरात प्रकरण चांगलेच भोवलं आहे. खरातसोबतचे फोटो,पाद्यपूजा करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला राज्य महिला आयोग अध्यक्षपद आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद अशा दोन मोठ्या पदांचे राजीनामे चाकणकरांना द्यावे लागले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर तब्बल सव्वा ते दीड महिना एक सोशल मीडियावरील पोस्ट वगळता सक्रीय नसल्याचं समोर आलं होतं. पण आता त्यांनी सोशल मीडियावरुन नवी अपडेट दिली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी (ता.28) सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवरुन नाशिकच्या नांदूरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतल्याचं दिसून येत आहे. यावरुन त्या पुन्हा एकदा राजकारणासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अॅक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे.

रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणानंतर पहिल्यांदाच नाशिकच्या नांदूरमध्ये कार्यकर्त्यांसोबत घेतलेल्या बैठक घेतली आहे. या बैठकीचे फोटो चाकणकरांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. त्यांनी या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती दिलेली नाही. पण या बैठकीचे फोटो शेअर करतानाच गोतावळ असे कॅप्शन दिलं आहे.

चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. चाकणकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले की, “मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे. आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles