खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला दुचाकी धडकली;सोनवणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती

बीडमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला भीषण अपघाताची घटना घडली आहे. त्यांच्या कारला दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिली. सोनवणे यांच्या कारच्या मागील बाजूची काच फुटली आहे. तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. सोनवणे यांच्या कारचा अपघात झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सुरक्षित असल्याचे सांगितले.

आज दुपारी बीड येथील नियोजित कार्यक्रम पूर्ण करून मस्साजोग येथील विवाह सोहळ्यास जात असताना, मस्साजोग येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी थांबलो असताना पाठीमागून आलेल्या एका तरुणाची दुचाकी माझ्या वाहनावर येऊन आदळली.

परमेश्वराची कृपा आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या अपघातात मला तसेच माझ्यासोबत असलेल्या कोणत्याही सहकाऱ्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. आम्ही सर्वजण पूर्णपणे सुखरूप आहोत. या घटनेमुळे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांनी काळजीपोटी संपर्क साधून विचारपूस केली. आपल्या प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादाबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मी पूर्णपणे सुरक्षित असून लवकरच पुन्हा जनतेच्या सेवेत हजर

तत्पूर्वी, खासदार सोनवणे यांच्या कारला दुचाकीने धडक दिली. अपघातात खासदार सोनवणे सुरक्षित आहेत. तर कारला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या दुचाकीस्वाराला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. या कारमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचे नुकसान झाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles