भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी

आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून पहिल्यांदा पाच नावांची अधिकीकृत घोषणा करण्यात आली आहे. यासह एका विधानपरिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाच्या अधिकृत यादीनुसार, भाजपाने पक्ष संघटनेत सक्रिय असलेल्या आणि विशेष प्रादेशिक वजन असलेल्या नेत्यांना संधी दिल्याचे दिसून येते.
भाजपाने जाहीर केलेल्या यादीत सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार या नावांचा समावेश आहे. पक्षाने यावेळी प्रस्थापित नेत्यांऐवजी संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. भाजापने काँग्रेसच्या विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांना त्याच पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. प्रज्ञा सातव यांच्या रूपाने भाजपने महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी केल्याचे दिसते, तर विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून नगरमधील स्थानिक सत्तासमीकरणे साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

.दुसरीकडे विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या नऊ जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची असून, त्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पुणे जिल्ह्यातील पुणे शहर किंवा पिंपरी-चिंचवड शहरातील एकाची निवड करून बालेकिल्ला मजबूत करणार की, नेत्यांचे पुत्र किंवा निकटवर्तीयांना संधी देऊन घराणेशाही जपणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.


विवेक कोल्हे हे सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन विवेक कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघातून माघार घेतली होती. त्यावेळी ही जागा अजितदादा गटाच्या आशुतोष काळे यांच्यासाठी सोडण्यात आली होती. तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा शब्द दिला होता. तो शब्द भाजपने पाळला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles