मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळ आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली. आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर प्रति तोळा ४४० रूपयांची घसरण नोंदवण्यात आली. एमसीएक्स (MCX) वरील व्यवहारातही सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली.
अमेरिकन डॉलरची किंमतीत वाढ, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीमुळे महागाईची चिंता वाढली आहे. पण सोन्याच्या किंमतीत मात्र घसरण नोंदवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजार अस्थिर झाल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ होत असले. सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हटले जाते, त्यामुळेच मार्केट अस्थिर झाल्यास सोन्यातील गुंतवणूक वाढते. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 1,49,180 इतके आहेत.
१ ग्रॅम – १४,९१८ – ४४ स्वस्त
८ ग्रॅम – १,१९,३४४ – ३५२ स्वस्त
१ तोळा (१० ग्रॅम) – १,४९,१८० – ४४० स्वस्त
१० तोळा (१०० ग्रॅम) – १४,९१,८०० – ४,४०० स्वस्त


