गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश; श्रीरामपूरपर्यंत धागेदोरे, डॉक्टरसह 5 जण अटकेत

पिंपरी निर्मळ येथील बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश केल्यानंतर त्याची धागेदोरे श्रीरामपूरपर्यंत पोहचले आहेत. राहात्यातील आणखी दोघा एजंटांना अटक केल्यानंतर त्यांनी श्रीरामपूरच्या डॉ. रवींद्र कुटेचे नाव सांगताच पोलिसांनी त्यांनाही गजाआड केले. दरम्यान पोलिसांनी एजंट प्रदीप ढगेकडून लिंग निदान करणारे आणखी एक मशीन पोलिसांनी जप्त केले. या केंद्राची व्याप्ती थेट पुण्यापर्यंत पोहचल्याचा संशय पोलिसांना आहे.प्रदीप भाऊसाहेब ढगे (रा.कोऱ्हाळे,राहाता), नीलेश ज्ञानेश्वर भवर (रा.नपावाडी,राहाता) आणि डॉ.रवींद्र कुटे अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. 10 हजार रुपयांत मुलगा की मुलगी सांगणाऱ्या पिंपरी निर्मळ (राहाता) येथील बेकायदा गर्भलिंग निदान केंद्रावर छापा टाकून 29 एप्रिलला पर्दाफाश केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना राहात्यातील आणखी दोन एजंट पोलिसांच्या रडावर आले. भक्कम पुरावे हाती मिळताच पोलिसांनी प्रदीप ढगे व नीलेश भवर या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहिती आधारे श्रीरामपूरच्या डॉ. रवींद्र कुटे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.

पिंपरी निर्मळच्या केंद्रातील बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणात डॉ. कुटेंचा सहभाग आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. कुटे हे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. लाईफ प्लस युएसजी. लॅपटॉप प्रोब मशीन चार्जरसह 25 लाख 9 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपअधीक्षक जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे, उपनिरीक्षक आशिष चौधरी अधिक तपास करत आहेत.

दोन डॉक्टरांसह पाच अटकेत

डॉ. राहुल आबासाहेब भणगे (रा.भानसहिवरे,नेवासा), डॉ. रवींद्र कुटे (श्रीरामपूर), अभिजीत दिलीप भुसाळ (पिंपरी निर्मळ), प्रदीप ढगे (रा.कोऱ्हाळे) आणि नीलेश भवर यांच्यासह गर्भ तपासणीसाठी आलेल्या महिलांच्या पतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles