Thursday, February 19, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त वर्ग-1’एसिबिच्या’ जाळ्यात

* यशस्वी सापळा कारवाई *
▶️ *युनिट -*अहिल्यानगर.
▶️ तक्रारदार- पुरुष,वय-41 वर्षे
▶️ आरोपी रमेशकुमार जगन्नाथ धडील,
वय- 57 वर्ष, धंदा-नोकरी, सहाय्यक आयुक्त, वर्ग-1, मत्स्य व्यवसाय (तांत्रिक), अहिल्यानगर, जि.अहिल्यानगर रा. ए-5, अँक्वा लाईन रेसिडेन्सी, धोंगडे नगर, नाशिक रोड, नाशिक

▶️ लाचेची मागणी-
30,000/- रुपये.
▶️ *लाच स्विकारली
20,000/- रुपये.
▶️ हस्तगत रक्कम-
20,000/- रुपये.

▶️ *लाचेची मागणी* दि.20/03/2025
▶️ लाच स्वीकारली
दि.20/03/2025
▶️ लाचेचे कारण यातील तक्रारदार यांची पत्नी व बहीण यांच्या नावे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत भुजलाशयीन पिंजरा मत्स्यसंवर्धन हा प्रकल्प मंजूर झाला आहे. शासनाच्या अटी व शर्ती प्रमाणे प्रकल्पाचे कामकाज पूर्ण झालेले आहे. तक्रारदार यांची पत्नी यांच्या नावे असलेल्या प्रकल्पास शासनाकडून आज पावतो 3,88,800/- रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच तक्रारदार यांची बहीण यांचे नावे असलेल्या प्रकल्पास शासनाकडून 29,16,000/- रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे. दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान मिळण्याकरिता प्रस्ताव शासनास पाठविण्याकरता आरोपी लोकसेवक रमेशकुमार जगन्नाथ धडील, सहाय्यक आयुक्त, वर्ग-1, मत्स्य व्यवसाय (तांत्रिक), अहिल्यानगर 40,000/- रुपये लाचेची मागणी करत असले बाबतची तक्रार दि.20/03/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार दि.20/03/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान
आरोपी लोकसेवक रमेशकुमार जगन्नाथ धडील यांनी तक्रारदार यांच्या दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान मिळण्याकरिता प्रस्ताव शासनास पाठविण्याकरता तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष 30,000/- रुपये लाचेची मागणी केली. दि.20/03/2025 रोजी वरवंडी, ता.राहुरी येथील श्री गोरक्षनाथ आडसुरे यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी सापळा आयोजित केला असता तक्रारदार यांच्याकडून आरोपी लोकसेवक रमेशकुमार जगन्नाथ धडील यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदर बाबत आरोपी लोकसेवक धडील यांचेविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन, जि.अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे .
▶️ *सापळा व तपास अधिकारी
श्री.अजित त्रिपुटे ,
पोलिस उप अधीक्षक , ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.8329701344

▶️ सापळा पथक
पोलीस अंमलदार संतोष शिंदे, रविंद्र निमसे,बाबासाहेब कराड, चंद्रकांत काळे, विजय गंगुल, चापोहेकॉ.दशरथ लाड

▶️ सापळा मदत पथक
पोलीस निरीक्षक श्री.राजू आल्हाट, पोलीस अंमलदार उमेश मोरे, गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, चालक पोहेकॉ.हारुण शेख

▶️ *मार्गदर्शक –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391

▶️ आरोपी लोकसेवक यांचे सक्षम अधिकारी * *मा. आयुक्त, मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles