तामिळनाडूच्या राजकारणात नवा ट्विस्ट! थलापती विजय यांचा शपथविधी रखडला; राज्यापालांनी घोषणाही पुढे ढकलली

तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच अजूनही सुटलेला नाही. टीव्हीके प्रमुख विजय थलपती यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेकडे सध्या 116 आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र अजूनही बहुमातासाठी 2 आमदारांची गरज आहे. काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. तर डाव्या पक्षांनीही विजय यांना पाठिंबा दिला. मात्र व्हीसीकेच्या समर्थनाशिवाय सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचं स्पष्ट झाले आहे. त्यामुळे व्हीसीके आज सकाळी टीव्हीकेला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत निर्णय घेणार आहे.विजय थलपती यांनी गेल्या दोन दिवसांपासून राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा सादर करत आहेत. आवश्यक संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावा विजय यांनी केला असून शपथविधीनंतर विधानसभा सभागृहात सहज बहुमत सिद्ध करू, असा विश्वासही त्यांनी राज्यपालांना दिला. मात्र असं असलं तरी राज्यपाल मात्र बहुमताच्या आकड्यावर अडून असल्याची माहिती आहे. विजय यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांची आणि आमदारांची माहिती राज्यपालांकडे सादर केली. सरकार स्थिर राहील आणि कोणतीही राजकीय अस्थिरता निर्माण होणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं. काल विजय यांनी सलग तिसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र अगदी शेवटच्या क्षणी आवश्यक असलेल्या पाठिंब्याच्या पत्राबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने राज्यपालांना शपथविधीची अधिकृत घोषणा पुढे ढकलावी लागली.
मी सत्तास्थापनेपासून कोणालाही कोणाला थांबवत नाही किंवा अडवत नाही, मी फक्त लोकशाहीचा पुरस्कार करतोय.
कोणत्याही पक्षाकडे कितीही आमदार असू देत, मला हेडकाऊंडशी देणंघेणं नाही,फक्त बहुमत हवं…
डीएमके-अण्णाद्रमुक एकत्र आले आणि त्यांनी बहुमत दाखवलं तर त्यांनाही संधी देईन…
वेळ लागतोय म्हणून जो काही आमदारांचा घोडाबाजार होईल, पण अस्थिर सरकारला मी परवानगी देणार नाही…
पुढचे 2-3 दिवस कोणी आले नाही आणि विजयकज् 118 आमदार नसतील काय? तर विजयनं फक्त मला 118 आमदारांचा पाठिंबा आहे. जर त्यांच्याकडे आमदार नसतील आणि मी त्याला शपथ दिली तर तो आमदारांचा घोडेबाजार नाही का करणार? त्याला कशी परवानगी देऊ?
आज-उद्या जो काही आमदारांचा घोडेबाजार झाला तर त्याच्याशी माझं देणंघेणं नाहीय…
सोमवारपर्यंत जर कोणीच सत्तेसाठी आलं नाही तर काय करणार? इतर पर्यायांचा विचार करणार, त्यावर अजून विचार केला नाहीय पण कायदेशीर बाजू समजूनच निर्णय घेणार…

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles