भाड्याचे पैसे मागितल्याने घर मालकावर चाकू हल्ला; नगर शहरातील घटना

अहिल्यानगर-शहरातील आगरकर मळा भागात घरभाड्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका भाडेकरूने घरमालकावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुळचे राजस्थान येथील बनवारी मोहन माळी हे अहिल्यानगर शहरातील आगरकर मळा येथील बेलेश्वर कॉलनीमध्ये वास्तव्यास आहेत. संशयित आरोपी सुरेश कुमार राधेशाम माळी हा त्यांच्याकडे भाड्याने राहत होता.

7 मे रोजी सकाळी बनवारी माळी यांनी संशयित आरोपीकडे थकीत भाड्याच्या पैशांची मागणी केली. आधी भाड्याचे पैसे दे, मगच तुझे सामान घेऊन जा, असे त्यांनी आरोपीला बजावले. या साध्या कारणावरून आरोपीचा पारा चढला आणि त्याने शिवीगाळ केली. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यावर आरोपीने बनवारी यांची गचांडी धरून त्यांना हाताने मारहाण केली.

यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी फिर्यादीने आरोपीला बाजूला ढकलले असता, रागाच्या भरात असलेल्या आरोपीने आपल्याजवळील चाकू काढून थेट फिर्यादीच्या गुप्तांगावर वार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी 9 मे रोजी गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles