नगर शहरातील सावेडी भागात युवक-युवतीला कोयत्याचा धाक दाखवून लुटले

अहिल्यानगर-शहरातल्या सावेडी भागात एका युवतीला आणि तिच्या मित्राला अडवून कोयत्याचा धाक दाखवत लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मारहाण करत युवतीच्या मोबाईलमधील ऑनलाईन पेमेंट वरून 30 हजार रुपये स्वतःच्या खात्यावर वळवून घेतले, तर खिशातील 5 हजार रुपये रोख काढून घेतले.

सदरची घटना 5 मे रोजी आठरे पाटील शाळेच्या पुढे रोडवर आणि शाळेच्या पाठीमागे घडली असून गुन्हा 9 मे रोजी दाखल झाला आहे. गोविंदपूरा भागात राहणार्‍या पीडित 24 वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश बाबासाहेब आरू, जॉय सोनवणे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवती तिच्या मित्रासोबत दुचाकीवरून इव्हेंटचे पैसे आणण्यासाठी एका शिक्षकांकडे जात असताना आठरे पाटील शाळेजवळ संशयित आरोपींनी त्यांना थांबवले.

महेश आरू, जॉय सोनवणे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी दुचाकीची चावी काढून घेतली आणि कंबरेचा कोयता काढून युवतीला मारहाण केली. संशयित आरोपींनी दोघांचे मोबाईल हिसकावून घेत पासवर्ड विचारले आणि युवतीशी गैरवर्तन केले. त्यानंतर आरोपींनी युवतीच्या खात्यावरून 30 हजार रुपये चोरले आणि दुचाकीतील 5 हजार रुपये रोख काढून घेतले. कोणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन चोरटे पसार झाले. पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles