नगर शहरात डायल ११२ ला खोटी माहिती देणे पोलिसांची दिशाभूल करणे तरुणाला भोवले

डायल ११२ ला खोटी माहिती देणे भोवले
अहिल्यानगर : शासकीय यंत्रणेचा विनाकारण वापर करून पोलिसांची दिशाभूल करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. कोठला परिसरात राहणार्‍या एका व्यक्तीने आपल्या वहिनीने मारहाण केल्याची खोटी माहिती मडायल ११२फ या मदत क्रमांकावर दिली. मात्र, तपासात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आल्याने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र तुकाराम घुंगासे हे रात्रीच्या वेळी मडायल ११२फ च्या कर्तव्यावर होते. यादरम्यान मध्यरात्री पावणे एक वाजेच्या सुमारास आरोपी अमीर सलीम शेख (रा. कोठला, अहिल्यानगर) याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. आपल्या वहिनीने आपल्याला मारहाण केली असून तातडीने मदतीची गरज असल्याचे त्याने सांगितले. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्षात त्या ठिकाणी चौकशी केली असता, मारहाणीची कोणतीही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले. केवळ पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने ही खोटी तक्रार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. सरकारी कर्मचार्‍यांच्या कामात व्यत्यय आणून खोटी माहिती दिल्याप्रकरणी रवींद्र घुंगासे यांच्या फिर्यादीवरून अमीर शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles