श्रीरामपूर: लग्नानंतर अवघ्या दहा दिवसानंतर पत्नीकडून मिळालेल्या धमक्यांमुळे तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. राहाता तालुक्यातील चितळी येथे ही घटना घडली. राहुल भाऊसाहेब खरात (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
राहुल खरात याचा विवाह ३० एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एका मुलीशी झाला. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच राहुलला पत्नी दुसऱ्या मुलासोबत चॅटिंग करत असल्याचे निदर्शनास आले.याबाबत विचारणा केली असता पत्नीने गेल्या चार वर्षांपासून
प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले. या प्रकरणावरून दोन्ही कुटुंबांत वाद झाला. ९ मे रोजी पत्नीचे आई-वडील आणि भाऊ तिला घेऊन माहेरी घेऊन गेले. माहेरी राहुल याला गेल्यानंतर पत्नीने व्हॉट्सऍपवर तिचे व प्रियकराचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवले. मला घटस्फोट हवा आहे, नाहीतर हे व्हिडिओ फेसबुक आणि यूट्यूबवर व्हायरल करेन,अशी धमकी तिने दिली. या मानसिक त्रासामुळे राहुल प्रचंड दडपणाखाली होता. याच विवंचनेतून त्याने ११ मे रोजी पहाटे राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, पत्नीने माहेरी जात असताना नेकलेस, अंगठी, मणी मंगळसूत्र, झुबे असे दागिने आणि कपाटातील १७ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. श्रीरामपूर तालुका पोलिसात पूजा मुकुंद सकपाळ (पत्नी), मुकुंद हरिभाऊ सकपाळ (सासरा), बेबी मुकुंद सकपाळ (सासू), करण मुकुंद सकपाळ (मेव्हणा) आणि आरती पारधे (मेहुणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नानंतर काही दिवसात नवविवाहितेकडन पतीच्या मोबाईल वर प्रियकराचे पाठवले अश्लील फोटो ; तरुणांचा बळी नगर जिल्ह्यातील घटना.
- Advertisement -


