केंद्र सरकारने बुधवारी (१३ मे २०२६) सोने-चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवले. परिणामी सोने एकाच दिवसात ९००० हजार तर चांदी १६,००० रुपयांनी वधारली होती. सलग दोन दिवसांच्या विक्रमी तेजीनंतर, आज १४ मे रोजी बाजार उघडताच सोन्याच्या भावात काहीशी घसरण दिसून आली आहे. ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’वर सोने प्रति १० ग्रॅम ३०१ रुपयांनी घसरले ,चांदीच्या दरातही ३,५३८ रुपयांची मोठी पडझड झाली आहे.
प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
शहर २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) २२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम)
पुणे १,६२,०१० रुपये १,४८,५१० रुपये
मुंबई १,६२,०१० रुपये १,६२,०१० रुपये
दिल्ली १,६२,१६० रुपये १,४८,६६० रुपये
चेन्नई १,६३,६८० रुपये १,५०,०१० रुपये
बेंगळुरू १,६२,०१० रुपये १,४८,५१० रुपयेन चांदीच्या दरातही ३,५३८ रुपयांची मोठी पडझड झाली आहे.
गुरुवारी (१४ मे) सकाळी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर, मागील सत्रात सोन्यात ६% ची जोरदार वाढ झाली होती. त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्याने सोने-चांदीच्या किमतीत घसरण झाली. एमसीएक्सवरील सोन्याचे जून वायदा दर ०.१८% ने घसरून १,६१,८९७ रुपये प्रति १० ग्रॅम झाले होते, तर चांदीचे जुलै वायदा दर १.०७% ने घसरून २,९७,०२७ रुपये प्रति किलोवर पोहोचले होते.
आज सकाळी चांदीचा भाव ३,१०,१०० रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, काल दिल्ली सराफा बाजारात चांदीने २०,५०० रुपयांची ऐतिहासिक झेप घेतली होती, त्यानंतर भाव २,९७,५०० रुपयांवर स्थिरावले होते. या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात चांदीने प्रथमच ४ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडून इतिहास रचला होता.


