onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -14-05–2026 एकुण कांदा गोणी -55,292
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 900 ते 1100
2 नंबर= 600 ते 900
3 नंबर= 300 ते 600
4 नंबर= 150 ते 300
————————————————————————————————————————————————–
जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला
नगर-तालुक्यातील धनगरवाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला लाकडी दांडयाने आणि टनक वस्तूने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनगरवाडी येथील शिकारे वस्तीवर हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना ही घटना घडली. फिर्यादी सचिन बाबासाहेब शिकारे यांना गावातीलच वैभव हरिभाऊ वाकडे आणि आदित्य हरिभाऊ वाकडे यांनी जुन्या वादातून अडवले. काही वेळातच त्यांचे जेऊर येथील मित्र ओम आढाव, गौरव जरे, कृष्णा तोडमल आणि तुषार वाघ हे अशोक लेलँड गाडीतून त्या ठिकाणी आले.
या सर्वांनी मिळून सचिन यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी ओम आढाव याने सचिन यांच्या डोयात टनक वस्तूने प्रहार केला, तर इतरांनी लाकडी दांडयाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी देऊन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. जखमी तरुणावर शेंडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चौधरी करत आहेत.


