मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, राज्य प्रशासनात फेरबदल विभागीय आयुक्तांना हटविले, तुकाराम मुंढे वेटिंग वर

मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक मोठा निर्णय घेताना प्रशासनात घाऊक बदल्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या होत्या. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल, केरळ राज्यांच्या निवडणुकांसाठी राज्यातील अनेक सनदी अधिकारी निरीक्षक म्हणून या दोन्ही राज्यात नियुक्त करण्यात आले होते. निवडणुकीच्या कामावरून हे अधिकारी परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा प्रशासनात खांदेपालट सुरू केली असून आज काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

विविध पदावर आपल्या कामाचा आणि कर्तुत्वाचा ठसा उमठविणारे वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना मात्र सरकारने पुन्हा एकदा वेटिंगवरच ठेवले आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून काम करताना मुंडे यांनी या विभागातील भ्रष्टाचार मोडून काढताना अनेक बोगस दिव्यांग कल्यान संस्थांवर कारवाईचा बडगा उगारत त्या बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नाराज झालेल्या मंडळींनी मुंढे यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्याकडे आग्रह धरला होता. परिणामी मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव पदावरून बदली करण्यात आली असून गेले महिनाभर मुंढे यांना कोठेही नियुक्त न देण्यात आल्यामुळे ते सध्या वेटिंग वरच आहेत.

पुणे विभागीय आयुक्त म्हणून आपल्या कामाचा प्रभाव पडणारे वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची तातडीने बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती आता ग्रामीण विकास आणि पंचायत राज सचिव म्हणून ग्रामीण विकास विभाग, मंत्रालय येथे करण्यात आली आहे. तर क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांची बदली विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे येथे झाली आहे. सध्या वैद्यकीय रजेवर असलेले दीपक सिंगला यांची बदली आयुक्त, क्रीडा आणि युवा, पुणे येथे झाली आहे.श्री मुरुगनंथम एम. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची बदली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर येथे झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles