लाडक्या बहिणींना खुशखबर! बँक खात्यावर पैसे जमा;४५०० की ३००० रूपये, लगेच करा चेक

ईकेवायसीच्या पडताळणीनंतर राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. गुरूवार संध्याकाळपासून अनेक लाडक्या बहि‍णींच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज आला. मार्च, एप्रिल आणि मे.. या ३ महिन्यांचा एकत्र हप्ता येईल, असा अनेकांना अंदाज होता. पण सरकारकडून फक्त एकाच महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर १५०० रूपये जमा झाले होते. त्यानंतर 3 महिने उलटल्यानंतरही फक्त एकच हप्ता जमा झाल्याने लाडक्या बहि‍णींमध्ये काहीशी नाराजी आहे. एप्रिलचा हप्ता कधी येणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना १५०० रूपयांचा सन्मान निधी सरकारकडून दिला जातो. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत हप्ता जमा होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. पण ईकेवायसी आणि आर्थिक वर्ष यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता ३ महिन्यांपासून जमा झाला नाही. रिपोर्ट्सनुसार, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात एकाचवेळी ३ हजार अथवा ४५०० रूपयांचा हप्ता जमा होईल, असे सांगण्यात येत होते. पण गुरूवारपासून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फक्त १५०० रूपये जमा होत असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात मार्च महिन्यांचा १५०० रूपयांचा सन्मान निधी जमा होत आहे. पण एप्रिल आणि मे महिन्यांचे पैसे कधी जमा होणार? असा सवाल पात्र महिलांना पडला आहे. अर्धा मे महिना संपला आहे, पण अद्याप एप्रिलच्या हप्त्याबाबत माहिती नाही, त्यामुळे आता दोन्ही हप्ते एकत्र येणार का? की मे महिन्याच्या अखेरीस एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाईल, असाही अंदाज लावला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles