सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. सोन्याच्या दरात गेल्या २-३ दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आज पुन्हा सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ९८० रुपयांची घसरण झाली आहे. जवळपास सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १००० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. सोन्याचे दर अनेक दिवसांपासून वाढत होते. प्रति तोळ्यामागे हे दर १,६१,००० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर आता हे दर कमी झाले आहेत. आजचे सोने चांदीचे दर जाणून घ्या.
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९८० रुपयांनी घसरले असून हे दर १,५६,९३० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ७८४ रुपयांनी घसरले असून हे दर १,२५,५४४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ९,८०० रुपयांनी वाढले असून हे दर १५,६९,३०० रुपये झाले आहेत.
आज २२ कॅरेट सोन्याचे दर ९०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,४३,८५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं ७२० रुपयांनी घसरले असून १,१५,०८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ९००० रुपयांनी घसरले असून हे दर १४,३८,५०० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७३० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१७,७०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ५८४ रुपयांनी घसरले असून हे दर ९४,१६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ७,३०० रुपयांनी स्वस्त झालं असून हे दर ११,७७,००० रुपये झाले आहेत.


