सुनील तटकरे अन् शरद पवारांची सिल्व्हर ओकवर गुप्तभेट;सुनील तटकरे यांचे थेट मोठे विधान

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदासोबतच सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सुत्रे आपल्या हाती घेतली. यादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुढे येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवार यांना समज द्यावी म्हणत थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केली. यासोबतच अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे पक्षाची महत्वाची पदे सोपवली. यासोबतच सुनील तटकरे देखील अचानक शरद पवार यांच्या भेटीला गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात सर्वकाही अलबेल नसल्याचे येणाऱ्या घडामोडींवरून दिसत आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही नाराज असल्याची चर्चा आहे. सुनील तटकरे थेट शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. मात्र, सुनील तटकरे यांनी त्या भेटीनंतर म्हटले की, मी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यास गेले होतो. सुनील तटकरे यांच्या भेटीवर भाष्य करणे शरद पवारांनी टाळले.

यादरम्यानच आता सुनील तटकरे यांनी मोठे विधान केले. सुनील तटकरे यांनी म्हटले की, माझा 42 वर्षाचा राजकीय प्रवास आहे, ज्यावेळी बोलायचे त्यावेळी मी बोलेल. मला राजकीय बोलायचे त्यावेळी मी नक्की बोलेल. माझा गेल्या 42 वर्षाचा राजकीय प्रवास हा खूप मोठा आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत करायचा आहे.पक्षाचे प्रमुख नेते आम्ही एकत्र बसून त्यातून मार्ग काढू. आमचे धोरण एनडीएमधील आहे. आम्हाला एनडीए मजबूत करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायचा आहे. त्याकरिता प्रफुल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, वळसे पाटील असतील आणि छगन भुजबळ असतील आम्ही एकत्रपणे बसू. प्रत्येकवेळी राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles