हळदीच्या कार्यक्रमात जुन्या वादातून घरात घुसून मारहाण ;नगर शहरातील घटना

अहिल्यानगर-शहरातील निर्मलनगर परिसरामध्ये हळदीच्या कार्यक्रमानंतर जुन्या वादातून घरात घुसून मारहाण आणि तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांसह इतर पाच ते दहा जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण विष्णू तांबे यांनी या संदर्भात पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण तांबे हे गोविंद राम इंगळे यांच्याकडील हळदीचा कार्यक्रम संपवून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ आले होते. त्यावेळी आरोपी गोविंद राम इंगळे, गोपाल राम इंगळे, जय चंद्रकांत इंगळे आणि गणेश राम इंगळे यांनी त्यांच्या इतर पाच ते दहा नातेवाईक व मित्रांसह तांबे यांच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला. सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी घरातील सदस्यांना बाजूला ढकलून देण्यात आले, ज्यामध्ये फिर्यादी यांच्या मुलीचा चष्मा फुटून नुकसान झाले. घटनेनंतर जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर आणि पोलीस अंमलदार पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles