नगर कल्याण रोडवर तरुणावर लाकडी दांडयाने जीवघेणा हल्ला ; पाच जणांवर कोतवालीत गुन्हा दाखल

अहिल्यानगर-शहर परिसरातील जाधवनगर, कल्याण रस्ता भागात जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या मित्राला लाकडी दांडयाने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवी ज्ञानेश्वर साळुंके (वय ३० वर्ष, रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा, अहिल्यानगर) हे आपल्या मित्रासह परिसरात गेले होते. रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जाधवनगर येथील साई रुग्णालयाच्या समोर आरोपींनी त्यांना गाठले. पूर्ववैमनस्यातून आरोपी सनी जाधव, त्याचे वडील राजेंद्र जाधव, समीर जहागीरदार, प्रमोद दाणे आणि अक्षय जाधव (सर्व राहणार जाधवनगर, कल्याण रस्ता, अहिल्यानगर) यांनी फिर्यादी रवी साळुंके यांना अचानक गाठून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्))यास सुरुवात केली. वाद वाढल्याने सर्व आरोपींनी एकत्र येत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान आरोपी राजेंद्र जाधव याने हातातील लाकडी दांडयाने रवी साळुंके यांच्या डोयावर जोरदार प्रहार केला. या गंभीर हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला मोठी दुखापत झाली.

आपल्या मित्राला वाचवण्यासाठी निखिल चव्हाण हा मध्यस्थी करण्यासाठी धावला असता, सर्व आरोपींनी त्यालाही लक्ष्य केले. आरोपींनी निखिल यालाही लाकडी दांडयाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याचेही डोके फोडले. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. जखमी अवस्थेत दोघांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर फिर्यादी रवी साळुंके यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली.
या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी सनी जाधव, राजेंद्र जाधव, समीर जहागीरदार, प्रमोद दाणे आणि अक्षय जाधव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पोलीस हवादार पालवे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles