राज्यातील राजाकारणात मोठ्या घडामोड घडत आहेत. महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झालाय. दुसऱ्या बाजुला शिंदे गट शिवसेनेनेकडून ऑपरेशन टायगर लॉन्च करत आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. ठाकरेंच्या खासदार त्यांच्या रडार आहेत. त्याचदरम्यान शिंदेंनी विदर्भात आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विदर्भात भाजपचं टेन्शन वाढण्याच शक्यता आहे.एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदी पुन्हा बसवणार. एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं विधानं करून राजकीय आखाड्यात हुंकार भरणाऱ्या बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत मोठी जबाबदारी दिली आहे. शिवसेनेचे विधान परिषद आमदार बच्चू कडू यांना विदर्भात पक्ष वाढीसाठी मोठी जबाबदारी दिली आहे.
नुकत्याच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षाच्या विदर्भ विभागीय नेते पदी नियुक्ती केली आहे. बच्चू कडूंना विदर्भात शिवसेना पक्षाचे संघटन, शाखा बांधणी व पक्ष वाढीसाठी ही जबाबदारी देण्यात आले आहे. शिवसेना पक्षात प्रवेश करताच बच्चू कडू यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी आणि मोटबांधणीचे कामे सुरू केली आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसवणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे हे रात्री दोन वाजताही जनतेसाठी दार उघडतात. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, अशी त्यांची भावना असते. त्यांच्या ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा, असे सर्वांनाच वाटते. जर आजही सर्वेक्षण केले, तर पुन्हा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हवेत, असेच लोक म्हणतील, असं विधान बच्चू कडू यांनी केलं होतं. त्यावरून राजकीय वातावरण तापलं होतं. त्यांच्या विधानावर भाजपनं तिखट पण सावध प्रतिक्रिया दिली होती. आता त्याच बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारी दिली आहे. विदर्भात सेनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.


