स्विस घड्याळ निर्माता कंपनी स्वॅच ‘AP x Swatch आणि जगप्रसिद्ध लक्झरी ब्रँड ऑडेमर्स पिगुए यांच्या रॉयल पॉप कलेक्शनच्या लाँचिंगवेळी बंगळुरू आणि मुंबईत प्रचंड गदारोळ झाला. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, सुरक्षारक्षकांना जमाव आवरताना बळाचा वापर करावा लागला.
बंगळुरूच्या फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये शनिवारी पहाटेपासूनच शेकडो तरुण आणि घड्याळ प्रेमींनी गर्दी केली होती. मॉलचे दरवाजे उघडताच लोकांनी बॅरिकेड्स तोडून आत पळण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये लोक एकमेकांना ढकलत घड्याळ खरेदी करण्यासाठी धावताना दिसत आहेत. मॉलच्या बाउन्सर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जमावाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण गर्दीपुढे त्यांचे काहीच चालत नव्हते. अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकांना बळाचा वापर करून लोकांना रोखावे लागले.
मुंबईतील लाँचिंगच्या ठिकाणीही अशीच परिस्थिती होती. घड्याळ खरेदीसाठी आलेले आणि रिसेलर्स रात्रीपासूनच रांगेत उभे होते. मुंबईतील एका प्रत्यक्षदर्शीने आपला संताप व्यक्त करताना सांगितले, “आम्ही काय जनावरं आहोत का. रांगेतील ढकलाढकली आणि शिवीगाळ पाहून या खरेदीतला सगळा आनंदच निघून गेला.
https://x.com/GabbbarSingh/status/2055908893084238108?s=20
जगभरात या घड्याळाची मोठी क्रेझ पाहायला मिळाली. दुबईतील दुबई मॉल आणि मॉल ऑफ दि एमिरेट्सबाहेर पहाटे ६:४५ वाजताच लोकांची गर्दी झाली होती. ५ ते ७ तास पार्किंगमध्ये थांबूनही लोकांना घड्याळ मिळाले नाही. अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहून स्वॅच कंपनीने दुबईतील विक्री तात्पुरती रद्द केली.


