cockroach-janta-party
सोशल मीडियावर तरूणांनी एकत्र येत‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना केली आहे. सोशल मीडियावर या पार्टीला अवघ्या काही दिवसांत 2.1 Million Followers मिळाले आहे.
सध्या सोशल मीडियावर एका नव्या “राजकीय पक्षाने” अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘Cockroach Janta Party’ (CJP) नावाने सुरू झालेली ही व्यंगात्मक मोहीम आता इंटरनेटवरील सर्वात मोठ्या चर्चांपैकी एक बनली आहे.
Instagram वर या पेजने तब्बल 2.1 Million Followers चा टप्पा पार केला असून, पोस्ट्स, मीम्स, रील्स आणि सदस्य नोंदणी मोहिमेमुळे हा ट्रेंड प्रचंड व्हायरल झाला आहे.
या मोहिमेमागे आम आदमी पार्टीचे माजी सोशल मीडिया कार्यकर्ते अभिजीत दिपके यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी व्यंगात्मक शैलीत सुरू केलेली ही मोहीम आता तरुणांच्या भावना, बेरोजगारी आणि व्यवस्थेवरील नाराजीशी जोडली जात आहे.
भारताचे सरन्यायाधीश न्या. सूर्यकांत यांच्या एका वक्तव्याच्या संदर्भातून ‘झुरळ’ हा शब्द सोशल मीडियावर ट्रेंड झाला आणि त्यावर आधारित ही संकल्पना पुढे आली असल्याचे बोलले जात आहे.
घोषणापत्रातील चर्चेतील मुद्दे :
🔸 महिलांसाठी ५०% आरक्षण
🔸 पक्षांतर करणाऱ्यांवर कठोर नियम
🔸 माध्यम क्षेत्रातील निष्पक्षतेवर भर
🔸 बेरोजगार तरुणांसाठी डिजिटल आंदोलन
या पक्षासंदर्भात सोशल मीडियावर हजारो मीम्स, व्हिडिओज आणि विनोदी पोस्ट्स व्हायरल होत आहेत. काही नेटिझन्स याला फक्त मनोरंजन मानत आहेत, तर काहींच्या मते हा तरुणांच्या नाराजीचा “डिजिटल आवाज” ठरत आहे.
विशेष म्हणजे, या मोहिमेने अल्पावधीतच लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले असून, सोशल मीडिया युगातील “व्यंगात्मक राजकारण” पुन्हा चर्चेत आले आहे.


