पंतप्रधान मोदींनी मेलोनींना दिली ‘गोड’ भेट; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या, ‘मेलोडी…’

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना थेट ‘मेलोडी’ चॉकलेट गिफ्ट दिलं आहे. मेलोनी यांनी या खास भेटीचा व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यानंतर इंटरनेटवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. यावर कमेंट अन् लाईक्सचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ५ देशांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. ५ दिवसाच्या परदेश दौऱ्यावर असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये दाखल झाले. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी रोममध्ये त्यांचे स्वागत केले. दोन देशातील प्रमुख नेत्यांची भेट विशेष होती. इटलीचे पंतप्रधान मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना स्वतः रोममधील सर्वात प्रसिद्ध स्थळ, कोलोसियमची सफर घडवली. दोन्ही नेत्यांनी एकत्र जेवण केले आणि गाडीतूनही प्रवास केला.या भेटीचे फोटो आणि व्हिडिओदेखील समोर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीदरम्यान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट गिफ्ट केले. मेलोनी यांना याचा व्हिडिओ सोशलवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले. हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.

भारत आणि इटली यांच्यातील राजनैतिक संबंधांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची मैत्री जगभरात नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. आता या दोन्ही नेत्यांचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली असता, त्यांना भारताचे प्रसिद्ध ‘मेलोडी’ चॉकलेट गिफ्ट म्हणून दिले. मेलोनी यांनी स्वतः या मजेशीर क्षणाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलापरराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, २०२३ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यातील ही आठवी भेट आहे. मार्च २०२३ मध्ये मेलोनी यांच्या भारत दौऱ्याने आणि जी-२० शिखर परिषदेतील त्यांच्या सहभागाने दोन्ही देशांमधील संबंधांना नवीन बळकटी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेलोनी यांनी रोममधील भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles