मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. महायुती सरकारनं जुलै 2024 पासून ही योजना सुरु केली आहे. या योजनेतील काही लाभार्थी महिलांना गेल्या आठवड्यात म्हणजेच 14 मे पासून मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली होती.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांना दोन्ही महिन्यांची रक्कम मिळाली नसल्याचं समोर आलं होतं. आज महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाकडून एक शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयानुसार 730 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही रक्कम मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी करण्यात आली आहे.सामाजिक न्याय विभागानं वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेसाठी महिला लाभार्थ्यांना माहे मार्च, 2026 साठी 365.2550 कोटी आणि एप्रिल 2026 करिता रू. 365.2550 कोटी असा एकूण रू. 730.5100 कोटी इतका निधी सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.सामाजिक न्याय विभागानं 730 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिल्यानं आता मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होऊ शकते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles