उपचारादरम्यान सहा वर्षीय प्रियांशी बागडे हिच्या मृत्यू प्रकरण ; खा. लंके यांनी विचारला रुग्णालय प्रशासनाला जाब

खा. लंके यांनी विचारला रुग्णालय प्रशासनाला जाब

उपचारादरम्यान सहा वर्षीय प्रियांशी बागडे हिच्या मृत्यूचे प्रकरण

पारनेर : प्रतिनिधी

उपचारादरम्यान सहा वर्षीय प्रियांशी बागडे या चिमुरडीचा झालेला मृत्यू अत्यंत धक्कादायक, वेदनादायी आणि संतापजनक आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी बुधवारी रात्री दीनानाथ रुग्णालयात जाऊन संपूर्ण प्रकरणाची प्रत्यक्ष माहिती घेत संबंधित डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला.

सुपा, ता. पारनेर येथील रहिवासी असलेली प्रियांशी बागडे हिला डोळ्यात तिरळेपणाचा त्रास असल्याने शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी विश्वासाने आलेल्या कुटुंबाला अशा प्रकारे आपल्या निष्पाप मुलीला गमवावे लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना खासदार लंके यांनी व्यक्त केली.

रुग्णालय प्रशासनाकडून या घटनेबाबत समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे सांगत खासदार लंके यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. उपचार प्रक्रियेदरम्यान कोणतीही हलगर्जीपणा, निष्काळजीपणा किंवा वैद्यकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

एका निष्पाप चिमुरडीचा जीव गेला आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रुग्णालय व्यवस्थेची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे,” असे खासदार नीलेश लंके यांनी म्हटले आहे.
तसेच, प्रियांशीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालून शासन आणि आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार नीलेश लंके यांनी दिवंगत प्रियांशी बागडे हिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत तिच्या कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.
प्रियांशीला न्याय मिळालाच पाहिजे,अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles