पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मागील दहा दिवसांमधली ही चौथी इंधन दरवाढ आहे. पेट्रोलची किंमत २ रुपये ६१ पैसे प्रति लिटर तर डिझेलची किंमत २ रुपये ७१ पैसे प्रति लिटर इतकी वाढली आहे. दिल्लीत आता डिझेलची किंमत ९५ रुपये २० पैसे लिटर इतकी झाली आहे. तर पेट्रोलची किंमत १०२ रुपये १२ पैसे झाली आहे. याचप्रमाणे मुंबई, कोलकाता, चेन्नईसह सगळ्या देशातले इंधनाचे दर वाढले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे, गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही चौथी दरवाढ आहे. पहिली दरवाढ १५ मे रोजी सुमारे ३ रुपयाने झाली. त्यानंतर १९ मे रोजी सुमारे ९० पैशांनी, पुन्हा २३ मे रोजी सुमारे ९० पैशांनी आणि आता, २५ मे रोजी पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच, गेल्या १० दिवसांत पेट्रोल प्रति लिटर ७ रुपये ३५ पैसे तर आणि डिझेल प्रति लिटर ७ रुपये ५३ पैशांनी महाग झाले आहे. चौथ्यांदा इंधन महागल्यामुळे वाहतूक खर्च प्रचंड वाढणार आहे. याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होऊन महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऐन उन्हाळ्यात लागलेल्या या महागाईच्या झटक्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे
कोलमडले आहे
गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही चौथी दरवाढ आहे. पहिली दरवाढ 15 मे रोजी सुमारे 3 ने झाली. त्यानंतर 19 मे रोजी सुमारे 90 पैशांनी, पुन्हा 23 मे रोजी सुमारे 90 पैशांनी आणि आता, 25 मे रोजी पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल प्रति लिटर 7.35 ने आणि डिझेल प्रति लिटर 7.53 ने महाग झाले आहे.


