कॉक्रोच जनता पार्टी विरोधात याचिका दाखल..सीबीआय चौकशी करण्यात यावी

cockroach janta party कॉक्रोज जनता पार्टी ही सोशल मीडियावरची एक चळवळ आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर ही चळवळ सोशल मीडियावर सुरु झाली आणि युवकांचा या चळवळीला चांगला प्रतिसादही मिळाला. दरम्यान या चळवळीची आणि तोतया वकिलांची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत असाही दावा करण्यात आला आहे की कॉक्रोच जनता पार्टीशी संलग्न असलेल्या गोष्टींचीही चौकशी केली जावी.

राजा चौधरी यांनी कॉक्रोच जनता पार्टी विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यांनी त्यांच्या याचिकेत कॉक्रोच जनता पार्टी आणि तोतया वकिलांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. कोर्टरुममध्ये करण्यात आलेल्या मौखिक टिप्पणीचा व्यावसायिक लाभ उठवण्याचा प्रयत्न या सगळ्यांनी केल्याचा आरोप राजा चौधरींनी केला आहे. कोर्टात जे काही उल्लेख झाले त्याचा उपयोग पैसे कमवण्यासाठी केला गेला असाही आरोप करण्यात आला आहे. याचिकेनुसार नुकत्याच पार पडलेल्या एका सुनावणीचा संदर्भ घेऊन त्यात हवे तसे बदल करुन, त्यातले संदर्भ हटवून सोशल मीडियावर मीम्स तयार करण्यात आले, व्यावसायिक उपयोग करण्यात आला. LiveLaw ने हे वृत्त दिलं आहे.

कॉक्रोच जनता पार्टी आणि तोतया वकिलांची सीबीआय चौकशी करण्यात यावी.

कॉक्रोच जनता पार्टीने व्यावसायिक उद्देशाने मीम्स वापरत न्यायालयात सादर झालेल्या टिप्पणीचा वापर केला.

मूळ संदर्भ खोडून सरन्यायाधीशांचं वक्तव्य सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles