Saturday, February 21, 2026

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुक ठाकरेंचा मास्टरप्लॅन ठरला

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. आज शिवसेना भवनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरेंकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकाचे मास्टारप्लान ठरवल आहे. ठाकरेंकडून विधानसभा निवडणुकीतील पराभव धुवून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणर आहे. मिनी विधानसभेसाठी ठाकरेंकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. ठाकरेंनी या निवडणुकीला सामोरं जाण्याआधी शिवसेना नेते, उपनेते, राज्य संघटकांवर महत्त्वाची जाबाबदारी सोपवली आहे.

ठाकरेंनी ज्या नेत्यांवर जबाबदारी सोपवली, त्या नेत्याला स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा मतदारसंघातील स्थितीचा आढावा घ्यायचा आहे. ही सर्व माहिती ठाकरेंना १९ जूनपर्यंत शिवसेना भवनात नेत्यांना सादर करायचा आहे. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles