Apple iPhone 18 Pro…लाँचिंगपूर्वीच फीचर्स आणि संभाव्य किंमतीमुळे टेक जगतात खळबळ

Apple iPhone 18 Pro लाँच होणाऱ्या iPhone 18 सिरीजची माहिती लीक झाली असून टेक विश्वात याची जोरदार चर्चा आहे. अ‍ॅडव्हान्स कॅमेरा आणि नवीन प्रोसेसरसह येणाऱ्या या फोनची भारतातील किंमत प्रीमियम श्रेणीत असेल.

ऍपलच्या पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 18 Pro सीरिजबद्दल सतत नवीन लीक्स समोर येत आहेत. ही सीरिज सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, यावेळी कंपनी डिझाइनमध्ये छोटे पण खूप महत्त्वाचे बदल करू शकते. नवीन A20 Pro चिपसेट, चांगली कॅमेरा सिस्टम आणि मोठ्या बॅटरीसह, iPhone 18 Pro सीरिज पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली बनविली जाऊ शकते. इतकंच नाही तर यावेळी सिरीला एक मोठा AI अपग्रेडही पाहायला मिळणार आहे. लाँचिंगपूर्वीच फोनचे फीचर्स आणि संभाव्य किंमतीमुळे टेक जगतात खळबळ उडाली आहे.

Apple यावेळी iPhone 18 Pro च्या डिझाइनमध्ये मोठा बदल करणार नाही, परंतु फोन नवीन कलर ऑप्शनसह येऊ शकतो. कंपनी डार्क चेरी, लाइट ब्लू, सिल्व्हर आणि डार्क ग्रे सारख्या नवीन रंगांवर काम करत आहे.

Apple त्याच्या नवीन iPhone 18 Pro मॉडेलमध्ये A20 Pro चिपसेट ऑफर करू शकतो, जो TSMC च्या 2nm प्रोसेस तंत्रज्ञानावर तयार केला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles