IPL 2026 पंजाब किंग्जचे या आयपीएलमधील प्रदर्शन अतिशय वाईट राहिले आहे. पंजाबने सुरुवातीला सलग सहा सामने जिंकले पण नंतर मात्र सलग सहा सामने जिंकण्यात ते अपयशी ठरले. शेवटच्या सामन्यात लखनौविरुद्ध पंजाबने विजय मिळवला. पंजाबला या हंगामात प्लेऑफचे तिकिटही मिळवता आले नाही. यामुळे आता पंजाबचे चाहते नाराज झाले आहेत.
पंजाब किंग्सचा अष्टपैलू खेळाडू हरप्रीत ब्रारने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःचा आणि त्याचे सहकारी प्रियांश आर्य व अर्शदीप सिंग यांचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये प्रियांशला स्लॉगर आणि अर्शदीपला व्लॉगर म्हटले आहे. मात्र, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने त्या फोटोवर कमेंट केल्याने चाहते संभ्रमात पडले आहेत. माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगने पंजाब आणि देशातील अनेक क्रिकेटपटूंसोबत पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर काम केले आहे
हरप्रीतने सोशल मीडियावर सहकारी क्रिकेटपटूंसोबतचा एक फोटो पोस्ट केला, तेव्हा युवराज सिंग ने आता तुम्हा सर्वांना चपलेने तुडवण्याची वेळ आलीये. अशी कमेंट केली आहे. पंजाब प्लेऑफमध्ये जागा मिळवू शकली नाही यामुळे कदाचित युवराज सिंगने अशी कमेंट केली असावी.
भारताचा अनुभवी यष्टीरक्षक संजू सॅमसनने 2026 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी युवराजसोबत काही काळ सराव केला होता आणि त्याला आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांसारखे खेळाडू युवराजच्या मार्गदर्शनाखाली खेळले आहे.


