ग्रामपंचायतीत सुमारे पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार…. महिला सरपंचावर निलंबनाची कारवाई

सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच लता फरांदे यांच्यावर प्रशासकीय कारवाईचा मोठा बडगा उगारण्यात आला आहे. तब्बल पावणे १७ लाखांच्या आर्थिक अनियमितता आणि गंभीर गैरव्यवहार प्रकरणी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत त्यांना सरपंच पदावरुन निलंबित करण्याचा अंतिम आदेश जारी करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि अधिकारांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आणि विरोधकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली होती. प्राथमिक तपास आणि त्यानंतर सादर करण्यात आलेल्या फेरचौकशी अहवालात सरपंचांवर ठेवण्यात आलेले काही आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles