आठवड्यातून फक्त 3 दिवसच भरणार शाळा? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…..

राज्यामध्ये जाणवणाऱ्या इंधन टंचाईच्या संकटामुळे उद्योग धंदे आणि शेतीची कामांना ब्रेक लागलाय. या इंधन टंचाईमुळे शालेय वाहतूक व्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली आहे. नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू असतानाच डिझेल आणि पेट्रोलच्या दरांनी डोकेदुखी वाढवली आहे, याचा थेट परिणाम आता शाळांच्या कामकाजावर होण्याची शक्यता निर्माण झालीय. इंधन टंचाई आणि वाढत्या खर्चाचा मेळ घालण्यासाठी मुंबईतील स्कूल बस ओनर्स असोसिएशनने सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे

राज्यातील वाढत्या इंधन दरवाढीमुळे स्कुल बस मालकांवर मोठे संकट ओढावले आहे. पुढील महिन्यात राज्यभरात शाळा सुरु होणार आहेत. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने त्याच दरात स्कुल बसची सेवा पुरवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. त्यामुळे एकाच सत्रात शाळा सुरु ठेवाव्यात, अशी मागणी स्कुल बस (School bus) संघटनेकडून करण्यात आली आहे. आठवड्यातून तीन दिवसच शाळा भरवा आणि दोन दिवस ऑनलाइन वर्ग सुरू ठेवा, असे स्कुल बस संघटनेचे म्हणणे आहे.

शाळा सुरू होण्याआधी एक जूनपर्यंत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती स्कूलबस मालकांकडून करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव पाहता राज्यातील स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने इंधनदरवाढीनंतर शाळा सुरू होण्यापूर्वीच बस सेवेचे शुल्क वाढवण्याचे संकेत दिले आहेत. सरकारने स्कूलबस क्षेत्राला तातडीने दिलासा देत अनुदान किंवा सवलती द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. यावर आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरात चारवेळा वाढ झाली आहे. सोमवारी देशभरात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्यानुसार आता पेट्रोलचे दर 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ झाली आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वात आधी वाढ झाली होती. त्यानंतर दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत गेले होते. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात एकूण 7 रुपये 38 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 7 रुपये 09 पैशांची वाढ झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles