पुणे ते अहिल्यानगर रस्ते प्रवास होणार सुसाट…सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प

Road travel from Pune to Ahilyanagar will be smooth पुणे ते शिरूर उन्नत महामार्गाच्या कामास राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मंजुरी दिली होती. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प राज्य सरकारकडे हस्तांतरित केला होता. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळावर सोपविली. या कामाची निविदा वेलस्पन कंपनीला मिळाली असून, आता महामंडळाकडून कंपनीला या प्रकल्पाचा कार्यादेश देण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ७ हजार ३०० कोटी रुपये आहे. हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्वावर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याची मुदत आहे.

पुणे ते शिरूर महामार्गावरील हा प्रकल्प एकूण ५३.४ किलोमीटर लांबीचा असेल. त्यात ३५.१२ किलोमीटरचा उन्नत सहापदरी मार्ग असेल. याचबरोबर सध्या असलेल्या महामार्ग अद्ययावत करून तो सहापदरी करण्यात येईल आणि त्याची लांबी १८.२ किलोमीटर असेल. हा मार्ग खराडी येथून सुरू होऊन शिरूरमध्ये संपेल. नियोजित रामवाडी ते वाघोली हा मेट्रो मार्ग याच महामार्गावरून जाणार आहे. त्यामुळे तिथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

पुणे ते शिरूरदरम्यान सध्याची वाहतूक कोंडीची स्थिती अतिशय बिकट आहे. यातून मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे आता पुणे ते शिरूर हा सहापदरी उन्नत महामार्ग तयार केला जाणार आहे.

पुण्यातून अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. यामुळे मराठवाड्याशी अधिक वेगवान जोडणी होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles