हार्दिकने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच खळबळ…CSK कडून खेळणार!

IPLया 19 व्या पर्वातील प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचे संघ पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्ससारखे दादा संघ प्लेऑफ फेरी गाठू शकले नाहीत. मुंबईच्या वाईट कामगिरीचं खापर कर्णधार हार्दिक पांड्यावर फोडलं जात आहे. हार्दिकला अनेकदा संधी देऊनही त्याने काही विशेष कामगिरी केली नाही असं मुंबईच्या प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या कायरन पोलार्डने मुंबई स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर बोलून दाखवलं. स्वत: हार्दिकने राजस्थान रॉयल्सविरुद्धची ग्रुप स्टेजमधील शेवटची मॅच गमावल्यानंतर कर्णधारपदाचं ओझं जाणवत असल्याचं सूचक विधान केलं. त्यामुळेच हार्दिकचं मुंबईच्या कर्णधरपदावर राहणं आता कठीण मानलं जात आहे. असं असतानाच आता हार्दिकने आगामी आयपीएलमध्ये म्हणजेच आयपीएल 2027 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून खेळणार असल्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे.

ती इन्स्टाग्राम स्टोरी हार्दिकनेही शेअर केली असून त्यात दिसणारा हात हा माहिका शर्माचा असल्याची चर्चा आहे. हार्दिकने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये कथितरित्या माहिका शर्माच्या हात लॅपटॉपच्या किबोर्डजवळ असून त्याच्या बाजूलाच असलेल्या मोबाईल फोनच्या स्क्रीनवर ’07:07′ हा आकडा अगदी ठसठशीतपणे दिसतोय. हा आकडा चेन्नईचा कर्णधार आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी संबंधित आहे.

धोनी कायम 7 क्रमांकाची जर्सी परिधान करुनच मैदानात उतरतो. त्यामुळेच आता हार्दिकने चेन्नईच्या संघात त्याची एन्ट्री होणार असल्याचे संकेत दिल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles