केडगाव दगडफेक प्रकरण: दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

केडगाव दगडफेक प्रकरण: दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

अहिल्यानगर, 26 मे 2026: केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेक आणि रस्ता रोको प्रकरणी दाखल गुन्ह्यातील सर्व 600 आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांचाही समावेश आहे.

एप्रिल 2018 मध्ये केडगाव येथे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.

हत्येच्या घटनेनंतर संतप्त जमावाने केलेली दगडफेक, रस्ता रोको, पोलिसांना शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणणे आणि मृतदेहाची अवहेलना करणे यावरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला होता.

सुरुवातीला पोलिसांनी या गुन्ह्यात सर्व आरोपींवर ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ केल्याप्रकरणी भादंवि कलम 308 लावले होते. मात्र, नंतरच्या तपासात पोलिसांनी हे गंभीर कलम वगळून इतर वाढीव कलमे लावली होती. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य काहीसे कमी झाले होते.

या कारवाईनंतर आमदार अनिलभैय्या राठोड यांनी म्हटले होते की केडगावमधील दगडफेक शिवसैनिकांनी केली नसून, मारेकऱ्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी आणि नातेवाईकांच्या आक्रोशातून ती झाली होती. शिवसेनेचा या दगडफेकीशी थेट संबंध नसताना पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, 2020 मध्ये करोना साथीच्या लाटेत राठोड यांचे निधन झाले. न्यायालयात खटला सुरू होता. आता निकाल आला असून सर्वांची सुटका झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles