धक्कादायक घटना, लग्नाची खरेदी झाली, मंडपही सजला;पीएसआय असलेल्या नवरदेवानेच नवरीला फसवले

आजपर्यंत तुम्ही मुलांना लग्नामध्ये फसवल्याच्या घटना पाहिल्या असतील किंवा बोगस लग्न लावणारी टोळी बघितली असेल. मात्र बीडच्या मातोरी गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चक्क पीएसआय असलेल्या नवरदेवानेच नवरीला फसवले. लग्न अवघ्या काही दिवसांवरती आले असताना नवरदेवाकडून लग्नास नकार देण्यात आला आहे. ऐवढेच नाही तर पीएसआय नवरदेवाने मुलीच्या कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवत धमकी दिली. या घटनेची सध्या बीडमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

आई-वडिलांनी कष्ट करून मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमा केले होते. ते लाखो रुपये साखरपुडा त्याचबरोबर लग्नाचे साहित्य आणि इतर साहित्यांमध्ये खर्च केले. त्यामुळे मुलीचे आई-वडील न्यायाची मागणी करत आहेत. पीएसआय असलेल्या पवन निंबाळकर नावाच्या नवरदेवाने नवरीला आणि नवरीच्या कुटुंबीयांना लग्नाचे आमिष दाखवून सोने कपडे आणि इतर साहित्य घेऊन लाखो रुपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी बीडच्या चकलांबा पोलिस ठाण्यात संबंधित पीएसआय पवन निंबाळकर यांच्याविरोधात मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे. ‘आम्ही पै,पै गोळा करून मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते. मात्र आमच्या सगळं संपलं आहे. आमचा मानसिक खेळ आणि आमची बदनामी संबंधित पीएसआयने केली असून त्यांनी अनेक मुलींना अशाच पद्धतीने फसवलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.

तर संबंधित प्रकरणांमध्ये मुलींनीच आम्हाला फसवल्याची तक्रार चकलांबा पोलिस ठाण्यामध्ये पवन निंबाळकर यांचे भाऊ यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आली आहे. या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी मला चुकीची माहिती सांगून या जाळ्यात ओढला आहे आणि माझी फसवणूक केली आहे अशी तक्रार चकलांबा पोलिस ठाण्यामध्ये दाखल असून दोन्ही तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस चौकशी करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles