लग्नसोहळा अधिकाधिक चांगला आणि अविस्मरणीय कसा होईल याकडे लक्ष दिलं जातं. पण या नादात काही वेळा अशा घटना घडतात की, त्याबद्दल काय बोलावं हेच कळत नाही. होय, आता हेच प्रकरण पाहा ना… लग्नात नवरदेव अपेक्षेपेक्षा मोठं वऱ्हाड घेऊन आला. त्यामुळे नवरीच्या वडिलांचं आर्थिक गणित बिघडलं. पण रागाच्या भरात नवरीच्या कुटुंबीयांनी जेवणात जमालगोटा मिसळला. अन् मग काय, संपूर्ण वऱ्हाडाचं पोट बिघडलं आणि ते नदीच्या दिशेने पळू लागले. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना बिहारमधील सिवाण येथे घडली आहे. घडलं असं की, नवरदेव दुप्पट वऱ्हाड घेऊन नवरीच्या घरी पोहोचला. लग्नात नवरा १०० पाहुणे घेऊन येणार, असं आधी ठरलं होतं. मात्र, प्रत्यक्षात २०० पाहुणे आले. अचानक १०० पाहुणे वाढल्यामुळे नवरीच्या कुटुंबीयांचं आर्थिक गणित बिघडलं. त्यामुळे लग्नमंडपात गोंधळ उडाला. तेवढ्यात नवरीच्या कुटुंबातील संतापलेल्या एका व्यक्तीने रागाच्या भरात जेवणात जमालगोटा मिसळलं. हे जेवण खाल्ल्यानंतर नवऱ्याच्या पाहुण्यांचं पोट बिघडलं आणि त्यांना जुलाबाचा त्रास सुरू झाला. परिणामी, ते शौचासाठी गावाबाहेर माळरानाकडे धावू लागले. ही घटना गावातील लोकांनी कॅमेऱ्यात कैद केली


