विधानपरिषदेसाठी माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील इच्छुक! सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले…

विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नगर जिल्ह्याची जागा भाजपला मिळणार अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारीसाठी अनेकांची भाऊगर्दी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अहिल्यानगरमधून माजी खासदार सुजय विखे, प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा जोर धरु लागलीयं. निवडणुकीच्या आधी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सुजय विखेंच्या उमेदवारीबाबत मोठं विधान केले आहे.

राम शिंदे म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेणार आहेत. निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये सत्यजित कदम, भानुदास बेरड यांच्यासह माजी खासदार सुजय विखे हे देखील इच्छुक आहेत. ते राज्यसभेला देखील इच्छुक होते आता विधान परिषदेसाठी देखील इच्छुक आहेत. आपण मागच्या दाराने जाणार नाही, असं ते म्हणाले होते. त्यामुळे आमच्याकडे उमेदवारांची देखील कमी नाही. याबाबत या निवडणुकीसाठी पक्ष पातळीवर निर्णय होईल, तसेच काही वेगळा देखील निर्णय होऊ शकतो असे सूचक वक्तव्य राम शिंदे यांनी केले आहे.

विधान परिषदेसाठी प्राजक्त तनपुरे यांचे नाव चर्चेत आहे. यावर शिंदे म्हणाले, त्यांचा कुठलाही अर्ज आमच्यापर्यंत आलेला नाही. त्यांचा व भारतीय जनता पार्टीचा सध्या तरी कोणताही संबंध नाही. याबाबत त्यांनी देखील खुद्द स्पष्टीकरण दिलेला आहे. मात्र, राहुरी पोटनिवडणुकीत त्यांनी माघार घेतली हे देखील विसरता येणार नाही. अद्याप तनपुरे यांनी भाजपकडे याबाबत कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही. तनपुरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली याबाबत योग्यवेळी समजेल असे राम शिंदे यांनी स्पष्ट केलं.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सत्यजित कदम हे इच्छुक असून त्यांनी राम शिंदे यांची भेट घेतली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles